आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:वंचित बहुजन आघाडीचे जलसमाधी आंदोलन; वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबध्द

ढाणकी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाणकी गांजेगाव ते सिंदगी रस्त्याचे काम जलद गतीने सुरू करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दि. १७ जूनला गांजेगाव येथील पैनगंगा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून स्थानबद्ध केले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विनकरे यांनी बांधकाम कामाचे कार्यकारी अभियंता यवतमाळ यांच्या कार्यालयात धाव घेवून परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या कार्यालयाकडून संबंधित ठेकेदारांना कामाची गती वाढवण्यासंबंधी सूचना द्याव्यात, अशी मागणी रेटून धरली यावेळी त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड, ढाणकी नगरपालिकेचे नगरसेवक संबोधी गायकवाड, जिल्हा महासचिव डी.के दामोदर, तालुकाध्यक्ष संतोश जोगदंडे, विष्णु वाढेकर, एस. के. मुनेश्वर, प्रवेश वाढेकर, विनोद बरडे, देवानंद पाईकराव, पप्पू गायकवाड, सुनील साखरे, हुसेन मौलाना, भारत राऊत, विजय राऊत, राहूल झुकझुके, आकाश राऊत, रवींद्र हाफसे, गोरक राऊत, भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष धम्मदीप काळबांडे, कैलास मासोळकर, अनिल जोगदंडे, सुमेध खंदारे, गौतम लोखंडे, मच्छिंद्र गायकवाड, सिद्धार्थ झुकझुके, विलास कव्हाणे, विश्वनाथ खीरे, विलास वाढेकर, सुनिल साखरे, इत्यादी कार्यकर्ते नदीपात्रात उतरून त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू
जलसमाधी आंदोलनाची तात्काळ दखल घेवून आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा कार्यकारी अभियंता यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर हजोरो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल., असा इशारा महासचिव जॉन्टी विनकरे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...