आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेसीबी:मुख्य मार्गावरील अतिक्रमणांवर फिरवला जेसीबी

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अंतर्गत रस्त्यांसह प्रमुख मार्गांवर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी अवैधरीत्या अतिक्रमण करुन ठेवले आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. ही बाब लक्षात घेता पालिका प्रशासनाने आता शहरात अतिक्रमण मोहिम हाती घेतली असुन त्यात पहिल्या दिवशी बसस्थानक चौक ते तहसील चौकादरम्यान असलेल्या मुख्य मार्गावर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर नगर पालिकेने थेट जेसीबी फीरवला.

पालिकेने अतिक्रमण काढायचे आणि काही दिवसात अतिक्रमण धारकांनी ते पुन्हा बसवायचे असा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्तेच नव्हे तर अंतर्गत रस्त्यांची ही रुंदी कमी झालेली आहे. मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने फुटपाथच्या ही पुढे आणली आहे. मुख्य बाजारपेठेतही दुकानांपुढे मोठे अतिक्रमण करण्यात आलेले आहे. मुख्य रस्त्यांच्या बाजुला असलेले फुटपाथ छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन चक्क गायब करुन टाकले आहेत. रस्त्यावर भाजी, फळ यासह इतर साहित्य विक्री करणाऱ्यांची गर्दी असते.

दत्त चौक, जाजु चौक, आर्णी नाका, स्टेट बँक चौक, सीव्हील लाइन, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ या सर्व ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी परिस्थिती भयावह असते. या ठिकाणांवरुन आणि शहरातील सर्वच रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्यावरुन वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते. या अतिक्रमणाचा वाहतुकीला आणि नागरिकांना मोठा अडथळा होत आहे.या सर्व बाबींची दखल घेत मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यावरुन अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...