आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:स्त्रीसंरक्षण प्रक्रियेतील पत्रकार हा महत्वाचा दुवा : विद्या खडसे

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे क्रांतीज्योती महिला पुरस्कार वितरण

स्त्री संरक्षणाचे कितीही कायदे सरकारने तयार केले तरी सुद्धा त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षम असावी लागते. सोबतच पत्रकारांकडून त्यास उचित प्रसिद्धी दिली जात असल्याने स्त्रीसंरक्षण प्रक्रियेतील पत्रकार हा महत्वाचा दुवा मानला जावा, असे मत अंकुर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विद्या खडसे यांनी व्यक्त केले. त्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती महिला पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या वेळी यवतमाळ आकाशवाणीच्या उद्घोषिका मंगला माळवे, बाल न्यायाधिकरणाच्या अ‍ॅड. संजू गभणे, सामाजिक कार्यकर्त्या शाहिस्ता खान, महिला उद्योजिका स्वाती पाटील उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षापासून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील आपापल्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना ‘क्रांतीज्योती महिला पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा टिळक स्मारक भवन येथे आयोजित केला होता. प्रशासकीय सेवेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.

यामध्ये नगर पालिकेच्या अध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, मुख्याधिकारी माधुरी मडावी, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत, माहिती व जनसंपर्क अधिकारी मनीषा साळवे, लोहाराच्या पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे, नेर अर्बनच्या अध्यक्षा अनघा गद्रे, आकाशवाणीच्या उद्घोषिका मंगला माळवे, अ‍ॅड. संजू गभणे, महिला उद्योजक स्वाती पाटील, अंगणवाडी सेविका मंदा वाघमारे यांना क्रांतीज्योती महिला पुरस्काराने गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष पद्माकर घायवान, तर स्वागतपर भूमिका स्वागताध्यक्ष विजय डांगे यांनी मांडली. सूत्रसंचालन विद्या चिंचोरे तर आभार तालुकाध्यक्ष प्रभाकर वडे यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्यासह प्रदेश अध्यक्ष पदमाकर घायवान, विदर्भ प्रदेश सचिव रवींद्र चरडे, प्रदेश उपाध्यक्ष विजय चाफले, प्रदेश संपर्क प्रमुख संतोष डोमाळे, प्रफुल्ल मेश्राम, अशोक उमरतकर, जर्रार खान, प्रशांत ढाले, सैयद आरिफ तसेच नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष किरण मुक्कावार, धर्मपाल माने, राजू सोनुने, अब्दुल रफिक, प्रकाश वानखडे, प्रभाकर वडे, नितीन पोकळे, सलीम सैयद, रत्नपाल डोफे, मोहंमद शहजाद, मुदस्सीर शेख, धनराज किरपान, सुखदेव लिल्लारे, नरेंद्र थुल, अब्दुल शकील, सैयद मुजिबोद्दीन, अमोल खोब्रागडे, अंकुश मेश्राम, आदी पत्रकार मंडळीने परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...