आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्कल देण्याची मागणी:काळी ग्रा.पं. प्रोसिडिंगची‎ माहिती देण्यास सचिव‎ करताहेत टाळाटाळ‎

महागाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीच्या मासिक‎ बैठकींच्या प्रोसिडिंग बुकची‎ माहिती देण्यास टाळाटाळ‎ करणाऱ्या सचिवाविरोधात सदस्य‎ आक्रमक झाले असून, त्यांनी‎ गटविकास अधिकाऱ्यांकडे‎ निवेदनाद्वारे कारवाईची मागणी‎ केली आहे.‎ महागाव तालुक्यातील काळी‎ दौ. ग्रामपंचायतीच्या मासिक‎ बैठकीत व ग्रामसभेत गावच्या‎ विकासासाठी घेण्यात आलेल्या‎ विकासकामांच्या संदर्भातील‎ अहवालाची नोंद करण्यात‎ आलेल्या प्रोसिडिंग बुकची‎ नक्कल देण्याची मागणी सदस्यांनी‎ केली.

मात्र त्यांना ही माहिती‎ देण्यास सचिवांकडून टाळाटाळ‎ होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत‎ प्रोसिडिंगमध्ये घेण्यात आलेल्या‎ ठरावांमध्ये मनमानी पद्धतीने‎ अनेक बदल केल्याचा संशय‎ सदस्यांना आल्याने त्यांनी या‎ ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची‎ मागणी महागाव पंचायत समितीचे‎ गटविकास अधिकारी यांच्याकडे‎ निवेदनाद्वारे केली आहे. या‎ निवेदनावर काळी दौ. येथील‎ ग्रामपंचायत सदस्या निशा मोरे,‎ मीना टेमकर, रफिक सिद्दीकी,‎ डोसानी यांच्या स्वाक्षऱ्या‎ असल्याचे कळवण्यात आले.‎