आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकारगिल विजय दिन म्हणून २६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा हवन फडकावला होता हा दिवस “कारगिल विजय दिवस” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची भावी पिढीला माहिती व्हावी म्हणून भास्करवार पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.याप्रसंगी इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यानी परिपाठाचे आयोजन केले होते.
आरती गरुडे हिने संचालन केले. भुमिका पवार, प्रतिक्षा जगताप यांनी भाषण दिले व स्नेहल चव्हाण हिने कविता म्हटली. अंजली पवार हिने प्रश्न विचारले. प्राची राठोड हिने प्रतिज्ञा म्हटली. सैनिकाच्या वेशभूषेमध्ये ऋषभ शेळके हा होता. या मुलांना मार्गदर्शन शिक्षिका. सपना घाडगे व सबा शेख यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उज्वल कुलकर्णी, गायत्री जगताप, अनिता ढाले, गिरिश जोशी, मुकेश, सागर, श्रद्धा ढाले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.