आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:वन विभागातील माहूर रोडलगत कासोळा; जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण

पुसद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन विभागातील माहूर रोडलगत कासोळा गावाजवळ असलेल्या वन विभागाच्या क्र. ८१० मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत सं.व.व्य. समीती, कासोळा ग्रीन मिशन, रोटरी क्लब, वसुंधरा बहुद्‌देशीय संस्था, ग्रामपंचायत कासोळा यांच्या संयुक्त सहकाऱ्याने यशस्वी पार पाडण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक सोनकुसरे, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्षा डॉ. माधवी गुल्हाणे, प्रा. दिनकर गुल्हाणे, रोटरी क्लबचे डॉ. खेडकर, अमोल गंगात्रे, सरपंच बाबाराव राठोड, अरविंद जाधव, रेश्मा लोखंडे, डॉ. डांगे, डॉ. गुजर, एसीए. नरोडे, विश्वास करे, आरएफओ प्रवीण राऊत, कुणाल लिमकर, सचिन सावंत, विशाल झांबरे, अजय राऊत, कुरोडे, मुनेश्वर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...