आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गावातील सूक्ष्म हालचालींवर लक्ष ठेवा; ठाणेदार पांडुरंग फाडे यांचे पोलिस पाटलांना आवाहन

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा, रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावर ध्वनिप्रदूषण होणार नाही या आदेशाचे काटेकोर पालन करा, असे आवाहन दिग्रस ठाणेदार पांडुरंग फाडे यांनी केले. ते शनिवार, दि. ७ मे रोजी तालुक्यातील पोलिस पाटलांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

महाराष्ट्रात सध्या भोंगे व हनुमान चालिसा यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता जिल्हा पोलिस विभागाकडून घेतली जात आहे. ध्वनिप्रदूषण संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तालुका पोलिस ठाण्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. यावरुन दिग्रस पोलिस ठाण्यात पोलिस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

सुक्ष्म हालचालीवर लक्ष ठेवा, कुठल्याही धार्मीक स्थळावर कोणतेही लाउडस्पीकर विना परवानगी लाऊ नये, असेही फाडे या बैठकीत म्हणाले. यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावातील पोलिस पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...