आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबीच्या पथकाची कारवाई:बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्राधार एलसीबीच्या जाळ्यात

यवतमाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट भारतीय चलन बाळगून त्याची शहरात विक्री करणाऱ्या चौघांना एलसीबी पथकाने अटक केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य सुत्रधार गेल्या ५ महिन्यांपासून फरार होता. दरम्यान, तो फरार आरोपी शहरात आला असता त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरुन कारवाई करत त्यास अटक करण्यात आली.

अब्दुल वाहीद मोहम्मद युसफ मोटलानी (३३) रा. मेनन कॉलनी भोसा रोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खऱ्या नोटांच्या बदल्यात २०० रुपयांच्या बनावट नोटा विक्री करत असलेल्या युवकांची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरुन केलेल्या कारवाईत २०० रुपयांच्या १०८ बनावट नोटांसह ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ही कारवाई १० मे २०२२ रोजी करण्यात आली होती. त्यात सय्यद वसीम सय्यद जमील (२३) बिलाल नगर, कोहीनूर सोसायटी, वसीम शहा उर्फ मुन्ना अहेमद शहा (२७) रा. पाटील ले-आऊट, दानीश शहा तयब शहा वय १९ वर्ष रा. सुंदर नगर, भोसा आणि शाकीब हमीद अकबानी (२१) रा. मेमन कॉलनी, यवतमाळ या चौघांना ताब्यात घेण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...