आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तरावर‎:श्री सखाराम महाराज विद्यालयाचा‎ खो खो संघ अमरावती विभाग स्तरावर‎

रिसोड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणीतील श्री सखाराम महाराज‎ विद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुले‎ व मुलींचे दोन्ही संघ जिल्हास्तरावर‎ विजयी होऊन ते संघ अमरावती‎ विभाग स्तरावर वाशीम जिल्ह्याचे‎ प्रतिनिधित्व करणार आहेत.‎ वाशीम जिल्हा अंतर्गत खो खो‎ क्रीडा स्पर्धेचे आयोजन २९, ३०‎ नोव्हेंबर रोजी वाशीम येथील जिल्हा‎ क्रीडा संकुलात करण्यात आले‎ होते. त्यामध्ये लोणीतील श्री‎ सखाराम महाराज विद्यालयाचे १९‎ वर्षाखालील मुले व मुलींचा संघ‎ जिल्हा स्थानावर विजय होऊन‎ अमरावती विभाग स्थानावर‎ पोहोचला आहे.

श्री सखाराम‎ महाराज विद्यालय लोणीच्या ग्रामीण‎ भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी‎ विभाग स्तरावर वाशीम जिल्ह्याचे‎ प्रतिनिधित्व करणार आहेत. या‎ संघामध्ये कर्णधार वैष्णवी गरकळ.‎ कोमल बोडखे, वैष्णवी बनपुरे,‎ पायल नळनकर, पायल निकस, दुर्गा‎ नळनकर, वृषाली बोडखे, श्रेया‎ बोडखे, प्रीती राऊत, निकिता‎ सोनुने, अनुजा गिरी, कल्पना घाटे,‎ निकिता वाकळे, गायत्री बोडखे,‎ प्रीती मोरे तर मुलांच्या संघामध्ये‎ रोहन जडवे, कार्तिक राऊत, अतुल‎ जडवे, प्रथमेश सोनुने, चैतन्य‎ सरोदे, सुमीत पुनवे, कल्याण सानप,‎ अभिषेक जाधव, विकास सानप,‎ तुषार पन्सारी, मंगेश चौगुले, पीयूष‎ जाधव, अमन नळनकर, मयूर‎ सानप, सोमेस्वर सानप यांचा‎ समावेश आहे. या दोन्ही संघाला‎ संस्थेचे सचिव डॉ. सखाराम जोशी,‎ संस्थेचे अध्यक्ष गोविंद जोशी,‎ प्राचार्य कल्याण जोशी, पर्यवेक्षक‎ जयंत वसमतकर , स्वप्निल पाठक,‎ प्रशिक्षक तेजस राऊत यांचे मोलाचे‎ मार्गदर्शन लाभले या विद्यार्थ्यांचे‎ सर्वत्र कौतुक होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...