आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार-मालक:बनावट दारू तयार करणाऱ्या बार-मालकासह मुलाला ठोकल्या बेड्या

वाशीमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पंचाळा फाट्यावरील ‘आयुष वाइनबार’मध्ये बनावट दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी धडक कारवाई करत बारमालक प्रभाकर महादू वानखडे व त्याचा मुलगा आयुष प्रभाकर वानखडे या दोघांना अटक करून ४ लाख ४३ हजारांचा दारूसाठा जप्त केला.

हिंगोली मार्गावरील पंचाळा फाट्यावर ‘आयुष वाइनबार’मध्ये निम्न दर्जाच्या दारूमध्ये भेसळ करून ती वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्यांची चढ्या भावाने विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वाईनबारवर छापा टाकला. तेथे त्यांना वेगवेगळ्या देशी-विदेशी कंपनीचा दारूसाठा, अन्य साहित्य आढळून आला. या धडक कारवाइदरम्यान पोलिसांनी ४ लाख ४३ हजार ५७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बारमालक प्रभाकर महादू वानखडे व त्याचा मुलगा आयुष प्रभाकर वानखडे (दोघेही रा. संतोषीमाता नगर, वाशीम) विरुद्ध गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहा. पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलिस उपनिरीक्षक शब्बीर खान पठाण, हवालदार किशोर चिंचोळकर, सुनिल पवार, राजेश राठोड, डिगावर मोरे, शंकर घोडे, विशाल मोहळे यांच्यासह वाशीम येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक गोपीनाथ पाटील, किरण बराई, गुंजन आडे, नितीन तिडके, ललित खाई, स्वप्निल लांडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...