आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:पळवून नेत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

मारेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी मारेगाव पोलिसांनी करीत मुलगी व त्या तरूणाला पोलिसांनी ठाण्यात आणले. रात्री त्या तरुणावर पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अजय गणेश मेश्राम वय २० वर्ष रा. चिंच मंडळ ता. मारेगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

मारेगाव तालुक्यातील चिंच मंडळ येथील रहिवाशी अजय मेश्राम याने काही दिवसापूर्वी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र मुलीने लग्नास नकार दिला. दरम्यान तू माझ्या सोबत आली नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेतो, अशी धमकी देऊन पीडित मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दि. २ सप्टेंबरला दुपारी त्या तरूणाला ताब्यात घेतले असून पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...