आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखंडाळा पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या नानंद (ई) येथील रहिवासी पद्माकर मेटकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्या व्यक्ती विरुद्ध त्यांनी पुसदचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे नुकतीच न्यायासाठी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ता मेटकर हे ऊसतोड कामगारांचे मुकादम असून ते १७ वर्षांपासून मुकादमाचे काम करीत आहे. त्यांनी महागाव तालुक्यातील काळी दौ. येथील आकाश ढगे यांना ऊस तोडणीच्या कामासाठी ९ लाख १० हजार रुपयांची रक्कम इसार म्हणून दिली होती. परंतु आकाश ढगे हे कामावर न जाता ती इसार रक्कम घेऊन पसार झाले. त्यामुळे पद्माकर मेटकर यांनी आकाश ढगे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
परंतू संबंधित व्यक्तीने फोन बंद करून ठेवला. त्यामुळे तक्रारदार मेटकर यांनी आकाश ढगे यांच्या साथीदार, दशरथ महादेव पाटील व नामदेव गंगाराम गोरल, रा. हल्लारवाडी जि. कोल्हापूर, यांना विचारपूस केली असता दशरथ पाटील व नामदेव गोरल या दोघांनी मिळून मेटकर यांना अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली व ते इथेच थांबले नाही. तर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून पद्माकर मेटकर यांचा अपमान जनक व्हिडिओ क्लिप बनवून व्हायरल करून मानसिक खच्चीकरण केल्याचा आरोप तक्रारदार यांनी सदर तक्रारीतून केला आहे. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मेटकर खंडाळा पो.स्टे येथे गेले असता ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू यांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायासाठी मेटकर यांना नाइलाजास्तव पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यास भाग पडले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.