आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाची हत्या:अवैध दारू विक्रीला विरोध करणाऱ्या युवकाची हत्या

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध दारू विक्रीला विरोध करणाऱ्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना पुसद तालुक्यातील गायमुख नगर येथे गुरूवार, दि. ३ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अरूण बळीराम राठोड (४५) रा. गायमुख नगर, पुसद असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सहा मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिवाजी चव्हाण (४०), सचिन चव्हाण (१९), राम राठोड (२९), राजू चव्हाण (४३), लक्ष्मीबाई चव्हाण (४०) आणि वंदना चव्हाण (३८) सर्व रा. गायमुख नगर, पुसद अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पुसद तालुक्यातील गायमुख नगर येथील अरूण राठोड याच्या घरा शेजारी राहणारे शिवाजी चव्हाण, राजु चव्हाण आणि सचिन चव्हाण आदी अवैध गावठी दारू विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यामूळे वेळी अवेळी दारू पिण्यासाठी येणाऱ्या मद्यपींचा अरूण राठोड याला त्रास होत होता. अश्यात आठ दिवसापूर्वी अरूण याने या दारू विक्रीला विरोध केला होता. त्यावरून अरूण याच्यासोबत चव्हाण कुटुंबीयांनी वाद करीत दारू विक्रीला विरोध करायचा नाही, अन्यथा तुला मारल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली होती.

दरम्यान गुरूवारी पहाटे याच कारणावरून सहा जणांनी मिळून अरूण याची धारदार शस्त्राने वार करीत निर्घृण हत्या केली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वसंतनगर पोलिसांनी गायमुख गाठून पाहणी केली. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला. या प्रकरणी बळीराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसंतनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी मारेकऱ्यांची शोधमोहीम राबवून एका तासातच सहाही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, सहायक पोलिस अधीक्षक तथा पुसद उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुंलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर सहायक पोलिस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलिस उपनिरीक्षक ठावरे, ज्ञानेश्वर धावडे, पथकातील रमेश इंगळे, अशोक चव्हाण, बालाजी ठाकरे, प्रेम राठोड, संतोष चव्हाण, युवराज जाधव, अखिल चव्हाण, रतीश वानखेडे, नितीन आडे, गजानन जाधव यांनी पार पाडली..

बातम्या आणखी आहेत...