आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसेवक:किसान सन्मानच्या कामास ग्रामसेवकांनी दिला नकार

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकास विभागाच्या प्रत्येक केंद्रीय योजना अभियानाकरिता महसूल, कृषी, वने व शिक्षण विभाग सहकार्य करीत नाही. परंतु महसूल विभागाचे काम ग्राम सेवकांकडून सक्तीने करून घेण्यात येत आहे. याचा प्रचंड ताण ग्रामसेवकांवर पडत असल्यामुळे सदर काम महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने नाकारले असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना मूळ ग्रामविकास व गाव विकासाची कामे पाहता लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक, कोरोना विषयक कामकाज, एमआरजीएस यांच्यासह इतर योजनांची कामे आहेत. पंचायत समिती विभागातील ग्रामविकास अधिकारी सचिव यांच्यावर इतर विभागांशी निगडित असलेल्या अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अनुषंगिक कामकाजाकडे पूर्ण क्षमतेने लक्ष देणे शक्य होणार नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने हे काम करण्यास नकार दिला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष हिम्मत म्हातारमारे, सरचिटणीस मंगेश गाउत्रे, आदि उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...