आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात आरोपी पसार:दोन तरुणांवर चाकू हल्ला

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या चौकात भर दिवसा दोन तरुणांवर चाकूने जीवघेणा हल्ला करुन अज्ञात आरोपी पसार झाले. संपुर्ण शहरात खळबळजनक उडवून देणारी ही घटना सोमवार दि. २ जानेवारी रोजी भर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास गुजरी चौकात घडली. जखमींपैकी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून दुसरा तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे‌.

ओसामा शमीम अहेमद वय २५ वर्षे रा. दूधे ले आऊट असे प्रकृती चिंताजनक असलेल्या तरुणाचे नाव आहे. तो काँग्रेस नेते तथा माजी नगरसेवक डॉ. मोहम्मद नदीम यांचा पुतण्या आहे. तर शेख हाफीज शेख कादर वय २३ वर्षे रा. मोबीनपुरा हा तरुण देखील गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओसामा व शेख हाफिझ हे दोन्ही तरुण गुजरी चौक येथे कामानिमित्त दुचाकीने आले होते.

यावेळी त्या ठिकाणी आलेल्या दोन अनोळखी मारेकऱ्यांनी गढी वार्ड कडून येऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात जखमी होवुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांना स्थानिकच्या रहिवाशांनी दवाखान्यात उपचारांकरिता दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे अधिक उपचारांकरिता दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...