आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूने हल्ला:माहेरी राहत असलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला

वणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी रहात असलेल्या पत्नीवर पतीने चाकू हल्ला चढवून जखमी केली. ही घटना गुरूवार, दि. १५ डिसेंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. अर्चना दिवाकर राजगडकर असे या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून दिवाकर राजगडकर असे या चाकू हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे.

माहेरी राहून खाजगी संस्थेत मदतनीस म्हणून काम करणारी अर्चना ही आपल्या सहकारी महीलांवरोबर कर्तव्यावर जात होती. यावेळी पती दिवाकर याने अचानक तिच्यावर चाकू हल्ला चढविला. यावेळी महिलेचा मुलगाही तिच्या पती सोबत होता. पण त्याने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या आधीही पतीने तिला न्यायालयाच्या आवारात मारहाण केल्याचे समजते. महिलेचा पती हा दारूचा व्यसनी असून तो दारू पिऊन नेहमी पत्नीशी वाद घालायचा व तिला मारहाण करायचा. त्यामुळे ती मागील काही दिवसांपासून माहेरी रहात होती.

गुरुवारी दारुड्या पतीने तिच्यावर चाकू हल्ला चढवून जखमी केले. सहकारी महिला मदतीला धावल्याने ती थोडक्यात बचावली. तिच्या हातावर व कंबरेवर चाकूचे वार बसले आहे. दिवाकर राजगडकर व त्याच्या चुलत भावांनी या आधीही अर्चना हिला फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली होती. दि. २५ ऑक्टोबरला महिलेने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार सुध्दा नोंदवली आहे. वणी ग्रामीण रुग्णालयात अर्चनावर उपचार सुरू आहे. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...