आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू हल्ला:हुडी येथील युवकावर चाकू हल्ला

पुसद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हुडी येथे राहणाऱ्या युवकावर जुन्या भांडणाचा वाचपा काढत चाकू हल्ला केला. या हल्ल्यात युवक जखमी झाला असून, त्याच्या भावालासुद्धा मारहाण करत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजता घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

सदाशिव कान्हेकर वय ३२, रा. हुडी असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून, गावातच राहणाऱ्या संजय थोटे वय २७ आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तर संजय थोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदाशिव कान्हेकर याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...