आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ग्राम पंचायत सदस्य व युवा काँग्रेसचे कुणाल नाईक यांची वर्णी महागाव तालुका अध्यक्ष पदी करण्यात आली असून त्यांना नुकतेच अनेक मान्यवरांच्या हस्ते पद नियुक्ती चढे पत्र देण्यात आले आहे.
जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागताच नेते मंडळी एकी कडे कामाला लागली आहे.तर दुसरी कडे पक्ष मजबुतीकरण वर सुद्धा जोर दिला जात आहे. सहा महिन्या पूर्वीच युवक काँग्रेसच्या निवडणुका सुध्दा पार पडल्या ज्या मध्ये युवक काँग्रेस ला युवराज पाटील देवसरकर यांच्या रूपाने नवीन विधानसभा अध्यक्ष मिळाला. त्यांनी पद भार सांभाळता युवक काँग्रेसच्या रिक्त असलेले अनेक पदे भरून पक्ष मजबुतीकरणाला गती दिली आहे. येथील वॉर्ड क्रमांक २ चढे ग्राम पंचायत सदस्य व युवा नेता कुणाल नाईक यांची नुकतीच युवक काँग्रेस महागाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी नाईक यांनी युवक काँग्रेसची सरचिटणीस पदाची जवाबदारी यशस्वी पणे हाताळली आहे.
कुणाल नाईक यांची युवा वर्गात असलेली मजबूत पकड हे काँग्रेस पक्षासाठी पूरक बाजू ठरेल यात काही शंका नाही. नाईक यांना सदर चढे नियुक्ती पत्र महागाव येथील कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर, शिवाजीराव मोघे, ॲड. सचिन नाईक, तातू देशमुख, प्रकाश पाटील देवसरकर, विजयराव खडसे, शिवाजीराव देशमुख, भगवान पंडागळे, शैलेश कोपरकर, युवराज देवसरकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.