आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुशिक्षित बेरोजगारांनी आपला उद्योग व्यवसाय सुरू करुन आत्मनिर्भर व्हावे तसेच इतरांना रोजगार द्यावे या उदात्त ध्येयातून खादी व ग्रामोद्योग आयोगातर्फे येथील संविधान चौक स्थित लॉर्ड बुद्ध विहारात जनजागृती मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा यवतमाळ करांनी लाभ घेतला. कार्यक्रमाला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर खोडके, ॲड. जयसिंह चव्हाण, खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूरचे विभागीय संचालक राघवेंद्र महिंद्रकर, जिल्हा समन्वयक आशा चहांदे, पर्यावरण व निसर्ग संस्थेचे कोषाध्यक्ष राजेश सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. खोडके म्हणाले, केंद्र शासनाचे अधिकारी आपल्या दारी आले आहेत,त्यांच्या विविध योजनांचा युवक- युवतींनी लाभ घ्यावा व स्वतः ला सक्षम करावे. ॲड. जयसिंग चव्हाण यांनी नविन उद्योजकांना ही सुवर्णसंधी असून आपल्या परिसराचा अभ्यास करावा मागणी व उपलब्धता पडताळून बघावे व पीएमईजीपी योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले.
समारोपीय मार्गदर्शनात महिंद्रकर म्हणाले, पीएमईजीपी योजनेत एक लाख रुपयांपासून पन्नास लाख रुपयांपर्यंत आपण कर्ज घेऊ शकता. तसेच यावर केव्हीआयसी तर्फे ३५ टक्के पर्यंत सबसिडीची तरतूद आहे.केव्हीआयसीच्या विविध योजनांसाठी आमच्या जिल्हा समन्वयक यांचेशी किंवा नागपूर विभागीय कार्यालयाशी संपर्क साधू शकता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सोनटक्के यांनी तर आभार आशा चहांदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मकसूद अली यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.