आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:लाख जि.प. शाळेत कवी उत्तम मनवर यांचा सत्कार; सन 2021-22 मधील शेवटची शिक्षण परिषद पार पडली

दिग्रस21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लाख येथील जि. प. शाळेत यवतमाळ जिल्ह्यातील पहिली आई-बाबांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. लाख रायाजी समुह साधन केंद्र तुपटाकळी अंतर्गत सन २०२१- २२ मधील शेवटची शिक्षण परिषद पार पडली.

शिक्षण परिषदेस यवतमाळ डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, विस्तार अधिकारी शुभदा पाटील, केंद्रप्रमुख किरण बारशे, प्रा. पंकज किन्हेकर आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त फुलवाडी जि.प. शाळेचे शिक्षक उत्तम मनवर यांना लाख शाळेचे मुख्याध्यापक योगेश देशमुख यांनी विशेष आमंत्रित केले होते. उत्तम मनवर यांना सन २०२२ चा महाराष्ट्र रत्न पुरस्कार महाबोधी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित तिसाव्या धम्म परिषदेमध्ये भदंत सुमेधबोधी महाथेरो वटफळी, भदंत नाग घोष पुणे, भदंत राहुल पुणे, आचार्य धम्मदीप पुणे यांचे हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरविण्यात आले.

लाख रायाजी शाळेचे मुख्याध्यापक योगेश देशमुख यांनी शेवटच्या शिक्षण परिषदेमध्ये कवी, नाट्यलेखक, संपादक आयु. उत्तम मनवर यांचा प्रमुख अतिथी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना उत्तम मनवर यांनी गुणवंत, गुणवान, जिद्दी विद्यार्थ्यांकरिता मोलाचे मार्गदर्शन केले.

शेवटी उत्तम मनवर यांनी गुणवंत विद्यार्थी ही कविता ऐकवून सर्वच प्रमुख पाहुण्यांना, पालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. पालकांनी मुलांचे हट्ट पुरवताना दक्ष राहायला हवे असे मत शीघ्र कवी आणि सत्कारमूर्ती उत्तम मनवर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी लाख येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचे आई वडील आरंभी, तुपटाकळी केंद्रातील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...