आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:प्रतिकूल परिस्थितीतही लक्ष्मीचे घवघवीत यश; सर्वांकडून कौतुकांचा वर्षाव

पुसद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातोश्री सुभद्राबाई जिल्हेवार विद्यालय श्रीरामपूर येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या लक्ष्मीचे आईवडील दोघेही मजुरी करून कुटुंब चालवितात. दोन मुली एक मुलगा त्यांचे शिक्षण त्यात पोटापाण्याचा प्रश्न मूलबाळ हुशार शिकवावे की जगवावे ह्यामुळे शिकवणी शक्यच नव्हते. तरीही अश्या प्रतिकूल परिस्थितीतही लक्ष्मीने ८३ टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले.

तिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुभाष कोसलगे, उपाध्यक्ष विनोद जिल्हेवार, सचिव आतिष कोसलगे यांनी कौतुक केले. मुख्याध्यापक विवेक जोशी, शिक्षक गणेश धर्माळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील शिक्षणासाठी तिला मदत करण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...