आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लंपास:प्रवासी महिलेच्या पर्समधून अडीच लाखांचे दागिने लंपास

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल अडीच लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही बाब लोहारा परिसरातील रेवती पॉईंट परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सीमा अमित आवारे वय २५ वर्ष रा. राऊत नगर, वाघापूर यांनी लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

शहरातील वाघापूर परिसरातील महिला सीमा आवारे या मावस दोराच्या लग्नाकरीता अमरावती येथे गेल्या होत्या. लग्न समारंभ आटपून त्या सोमवारी अमरावती येथून यवतमाळकडे येण्याकरीता यवतमाळ-तेल्हारा बसमध्ये बसल्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी हातचलाखी करीत त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे पेंडॉल, कानातले, सोन्याचे नेकसेल असा एकूण २ लाख ३९ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही बाब यवतमाळ शहरातील रेवती पॉईंट परिसरात येताच सीमा आवारे यांच्या लक्षात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी थेट लोहारा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...