आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून सुरू असलेला वाद विकोपाला जावुन चुलत काकाने मित्रांच्या मदतीने मिळून पुतण्या आणि त्याचा मित्राचा खून केला. ही खळबळजनक घटना घाटंजी मार्गावर असलेल्या कोळंबी फाट्यापुर्वीच्या घाटामध्ये सोमवारी 1 मे रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या 16 तासात घटनेचा उलगडा करीत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. अविनाश हनुमंत कटरे वय 32 वर्षे रा. चापडोह पुनर्वसन आणि उज्वल नारायण छापेकर वय २८ वर्षे रा. भोसा अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पत्रकार परिषद घेवुन माहिती दिली.
घाटंजी मार्गावर कोळंबी फाट्याआधी दोन व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडुन असल्याची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांसह सर्व पोलिस पथके आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटना स्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी प्रत्येक छोट्या-छोट्या बाबी तपासुन पाहण्यात आल्या. त्यात सुरुवातीस मृताच्या हातावर गोंदवुन असलेल्या नावावरून मृतांची ओळख पटवण्यास सुरूवात करण्यात आली.
हे दोघे मृत सेंट्रींग ठोकण्याचे काम करीत असल्याची माहिती पहाटे पोलिसांना मिळाली. त्यानंतर तपासाचा एकेक धागा जोडला असता त्यांना मृत पाटापांगर गावातील असल्याचे कळले. त्यावरुन पाटापांगरा गाव गाठून चौकशी केली असता मृत अविनाश याच्या पाटापांगरा ता. घाटंजी गावात वडिलोपार्जित असलेल्या घराच्या जागेच्या हिस्सेवाटनीत आलेली जागा रिकामी करुन देण्याच्या कारणावरून त्याच्या चुलत आजी व तीचा मुलगा विकास कटरे याच्याशी वाद सुरू होता.
दरम्यान मृत अविनाश हा त्याचा मित्र उज्वल याच्यासोबत १ मे रोजी पाटापांगरा येथे गेला होता. त्या ठिकाणी त्याने आजीसोबत वाद घातला होता. त्यानंतर ते यवतमाळकडे निघुन गेल्याची माहिती हाती आली. याचवेळी मृताचा चुलत काका विकास कटरे गावात नसल्याची माहिती मिळाली. त्यावरुन संशय आल्याने पोलिस पथकाने विकासचा शोध सुरू केला.
दरम्यान बाभुळगाव तालुक्यातील गळवा या गावातुन विकास लालचंद कटरे वय २३ वर्षे रा. पाटापांगरा यास ताब्यात घेण्यात आले. त्याने जागा रिकामी करुन देण्याच्या कारणावरून दोन मित्रांच्या मदतीने अविनाश आणि उज्वल याचा खुन केल्याची कबुली दिली. ही माहीती मिळताच पोलिस पथकाने भारत गाडेकर आणि गजानन रामराव मोरे दोघेही रा. मोहम्मदपुर ता. बाभुळगाव यांना ताब्यात घेतले.
पिशवीतील समोशावरुन मिळाली माहिती
घअनास्थळाची पाहणी करताना मृतांच्या दुचाकीला अडवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये समोसे पोलिसांना आढळुन आले. या सामोशांची बांधणी एका विशिष्ट पद्धतीची असुन असे समोरे घाटंजी येथे विक्री करण्यात येतात याची माहिती मिळाली. या समोशावरुन मृत घाटंजीच्या दिशेने आले असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली.
दुहेरी खुनाची घटना घडल्यानंतर विविध पोलिस ठाणे, स्थनिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी सांघिकपणे केलेल्या कामामुळे अवघ्या काही तासात घटनेचा उलगडा होवुन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. या सर्व आरोपींना सायंकाळी उशीरा यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास आता यवतमाळ ग्रामीण पोलिस करणार आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा प्रदीप पाटील, विनायक कोतते, दिनेश बैसाने, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे, वडगाव जंगल ठाणेदार संजय खंडारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, पोलिस उपनिरिक्षक राहुल गुहे, हवालदार साजीद सैय्यद, बंडु डांगे, अजय डोळे, रुपेश पाली, विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेढवे, ध्नंजय श्रीरामे, चालक अमीत कुमरे, जितेंद्र चौधरी व सायबर सेलच्या पथकाने पार पाडली. Share with facebook
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.