आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस छापा:बेवारस लाकडाचा मोठा साठा केला जप्त

दारव्हा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मल्लिकार्जुन मंदिरालगतच्या परिसरात बेवारस अवस्थेत पडुन असलेला वनउपजचा मोठा साठा वन विभागाने जप्‍त केला. ही कारवाई शनिवार दि. १८ जुन रोजी पोलिस पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली. मात्र इतका मोठा साठा कुणाचा या प्रश्नावरुन शहरात आता विविध चर्चेला ऊत आलेले दिसत आहे.

शहरातील मल्लिकार्जुन मंदिरा लगत असलेल्या परिसरात अवैधरीत्या गोळा केलेला लाकूडफाटा मोठ्या प्रमाणात पडून असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळाली. पथकाने दि. १८ जून रोजी त्या परिसरात जावुन तपासणी केली. लाकूड फाटा मोठ्या प्रमाणात साठवून असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यावरुन हा बेवारस लाकूड फाटा नेमका कुणाचा याबाबत वन विभागाने चौकशी सुरू केली. त्यानंतर वन विभागाने पोलीस बंदोबस्तात हा संपुर्ण साठा जप्त केला.

शोध घेण्यात येत आहे
सदर लाकूड-फाटा नेमका कुणाचा आहे याबाबत वन विभागाने चौकशी केली. त्यात कोणीही मालकीहक्क न दाखविल्याने हा लाकूड-फाटा दारव्हा वन विभागाने जप्त केला आहे. सदर लाकूड-फाटा कोणी साठवून ठेवला याबाबत शोध घेण्यात येत आहे.
अक्षय करमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, दारव्हा

बातम्या आणखी आहेत...