आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफलाइन अर्ज:शेवटच्या दिवशी मिळाली ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची परवानगी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असताना ऑनलाइन नामांकन अर्ज करताना अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता नामांकन अर्ज करण्यासाठी शुक्रवार, २ डिसेंबर हा शेवटचा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत निवडणुक आयोगाने शेवटच्या दिवशी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज देण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे नामांकनाच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची गर्दी उसळणार आहे.

जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा ज्वर चढलेला दिसत आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पार पडणाऱ्या या निवडणुकीत ३०८ प्रभाग आणि थेट सरपंच पदाच्या १०० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या १०० ग्रामपंचायतींमध्ये ७७६ सदस्य पदांसाठी जोरदार लढाई होणार आहे.

या निवडणुकीसाठी येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असली तरी ऑनलाइन पद्धतीने नामांकन अर्ज दाखल करतेवेळी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे नामांकन अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधीपर्यंत सदस्यपदासाठी १६१ व सरपंचपदासाठी ४३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे नामांकनाच्या शेवटच्या दिवशी ऑफलाइन अर्ज देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी नामांकनासाठी सर्वत्र मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात पार पडत असलेल्या या ग्रामपचांयतीच्या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहे. शुक्रवारी नामांकन अर्ज भरल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला आनखी रंग चढणार आहे. कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...