आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी अर्ज:शेवटच्या दिवशी  रेकॉर्ड ब्रेक उमेदवारी अर्ज दाखल

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील स्तरावर एकच गर्दी जमली होती. शेवटच्या मोठ्या संख्येने नामांकन दाखल झाले, परंतू वृत्त लिही पर्यंत आकडेवारी मिळू शकली नाही. गुरूवार, दि. २ डिसेंबर रोजी पर्यंत सदस्यांकरीता ५९०,तर सरपंच पदासाठी १४४ नामांकन अर्ज प्राप्त झाले होते.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या शंभर ग्रामपंचायतीच्या ३०८ प्रभागातील ७७६ सदस्य आणि शंभर सरपंचासाठी रविवार, दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सोमवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी पासून नामनिर्देश पत्र स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही नामांकन दाखल झाले नव्हते. तर दुसऱ्या दिवसांपासून नामांकन दाखल होण्यास सुरूवात झाली होती. गुरूवार, दि. एक डिसेंबर रोजी सदस्यांसाठी ४२९ आणि सरपंच पदा करीता १०१, असे नामांकन अर्ज दाखल झाले होते. तर एकूण सदस्यांसाठी ५९० आणि सरपंच पदा करीता १४४, असे मिळून ७३४ नामांकन अर्ज प्राप्त झाले होते.

शुक्रवार, दि. २ डिसेंबर नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सायंकाळी उशीरापर्यंत नेमके किती अर्ज आले हे कळू शकले नाही, परंतू ऑनलाईन अर्ज भरणाऱ्यांची संख्या बघता हजारांवर नामांकन अर्ज दाखल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी पर्यंत अर्जाची छाननी होणार आहे. बुधवार, ७ डिसेंबर रोजी पर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, त्याच दिवशी दुपारी उमेदवारांना चिन्हे वाटप केले जाणार आहे. तद्नंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंगत येइल. साधारणत: दहा ते अकरा दिवस प्रचारासाठी मिळणार आहे. रविवार, दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, लगेच १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मिनी मंत्रालयावर सर्वाची नजर
सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रशासकराज आहे. येत्या काळात ह्या निवडणुकासुद्धा लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वच प्रमुख राजकीय पक्षाने सराव परिक्षा म्हणून बघण्यास सुरूवात केली आहे. या निवडणुकीवरूनच बहुतांश जणांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...