आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करा असे निर्देश नवे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या पहिल्या बैठकीतच सोडले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. त्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डोंगरखर्डा गावात एकाचवेळी छापेमारी करत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यांकडून सुमारे २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शेख सादीक शेख इब्राही (४२) रा. डोंगरखर्डा, अनील जयस्वाल, (६१) रा. अवधुतवाडी, अविनाश गावंडे (२७) रा. झाडकिन्ही, विनोद जाधव (४३) रा. पिंपळशेंडा आणि रमेश खोकले (३९) रा. रावेरी ता. राळेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्याजवळून ६ मोबाइल, ६ दुचाकी, नगदी १ हजार ३८० रुपये असा सुमारे २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना अटक करुन कळंब पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्या ठिकाणी या सर्व पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना पुढील कारवाईसाठी कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलिस उपनिरिक्षक सागर भास्करवार, कर्मचारी हरीष राऊत, उल्हास कुरकुटे, विनोद राठोड, निलेश राठोड आणि सतीश फुके यांच्या पथकाने पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.