आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएलसीबी पथकाने सुगंधित गुटखा गोदामावर धाड टाकून एक लाख ६० हजार ६९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील शिक्षक कॉलनीत केली. या प्रकरणी प्रभाकर लालंगकर वय ६५ रा. शिक्षक कॉलनी याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील शिक्षक कॉलनीतील प्रभाकर तालंगकर हा त्याच्या घरातील टीन शेडमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीकरिता बाळगून होता. याबाबतची माहिती एलसीबी पथकाला मिळाली.
त्यावरून शुक्रवारी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोफाळी गाठून त्या गोदामावर धाड टाकली. यावेळी एक लाख ६० हजार ६९२ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यावरून पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही कारवाई एलसीबीतील सपोनि अमोल सांगळे, पीएसआय सागर भारस्कर, पथकातील सुभाष जाधव, पंकज पातुरकर, सोहेल मिर्झा, मो. ताज, सुनील पंडागळे, दिगांबर गिते यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.