आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चोरट्यांकडून तब्बल 9 दुचाकी जप्त‎:एलसीबी पथकाची उमरखेड ठाण्याच्या हद्दीत कारवाई, दोघांना अटक‎

उमरखेड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड तालुक्यातील दुचाकी‎ लंपास करणाऱ्या टोळीतील दोघांना‎ अटक करण्यात एलसीबी पथकाला‎ यश आले असून त्या दोघांकडून‎ तब्बल ९ दुचाकी जप्त करण्यात‎ आल्या आहे. ही कारवाई रविवारी‎ करण्यात आली असून गजानन‎ मेटकर रा. कवळेशाहबाबा नगर‎ आणि सलीम खान उस्मान खान रा.‎ रहीम नगर, उमरखेड अशी ताब्यात‎ घेण्यात आलेल्या दोघांची नावे‎ आहे.‎ पुसद आणि उमरखेड हद्दीतील‎ चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीच्या‎ अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत‎ असून या चोरट्यांच्या मुसक्या‎ आवळण्याचे निर्देश पोलिस‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी‎ एलसीबी पथकाला दिले होते.‎ त्यावरून पथकातील अधिकारी,‎ कर्मचाऱ्यांनी चोरट्यांचा शोध सुरू‎ केला होता.

या प्रकरणी दुचाकी‎ चोरी प्रकरणातील संशयित‎ उमरखेड शहरातील असल्याचे‎ समोर आले. दरम्यान पोलिसांनी‎ संशयित गजानन मेटकर आणि‎ सलीम खान उस्मान खान या‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दोघांना ताब्यात घेतले. यावेळी‎ दोघांकडून ९ दुचाकी जप्त करण्यात‎ आल्या. ही कारवाई वरिष्ठ‎ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली‎ सहायक पोलिस निरीक्षक अमोल‎ सांगळे, उपनिरीक्षक सागर‎ भारस्कर, तेजाब रणखांब, सुभाष‎ जाधव, पंकज पातुरकर, साहेल वेग‎ मिर्झा, सुनील पंडागळे, मोहम्मद‎ ताज, दिगंबर गिते यांनी पार पाडली.‎