आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:मारेगावात नितेश कराळे यांचे व्याख्यान

मारेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अस्सल ग्रामीण भाषा व विनोदातून प्रबोधन यातून सर्वांच्या मनावर भुरळ पाडून स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. नितेश कराळे यांचा मारेगाव येथे २५ डिसेंबरला सकाळी १० वाजता कार्यक्रम आयोजित केला आहे.

महाविद्यालयाच्या सभागृहात स्थानिक कला वाणिज्य व विज्ञान आयोजित कार्यक्रमाला रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे, लोढा मल्टि स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा स्वागताध्यक्ष राहणार आहे. प्राचार्य डॉ. अविनाश घरडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रेस संपादक, पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल.

बातम्या आणखी आहेत...