आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने पंचायत समिती सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विजय टेकवानी होते, मंचावर गटविकास अधिकारी गजानन खुळे,महिला व बालविकास विभागाचे जिनसाजी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात झाली.विधी स्वयंसेवक माधव डोंगरदिवे यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा,शितल बनसोड यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा, आचल आठवले यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा,शिवाजी चाबुकस्वार यांनी बाल विवाह प्रतिबंधक कायदा या विषयावर मार्गदर्शन केले.श्री. खुळे यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.
तर जिनसाजी चौधरी यांनी महिला व बालकांसाठीच्या योजनांची माहिती दिली. अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना श्री. टेकवानी म्हणाले की, महिलांना कायदेविषयक कुठलीही अडचण असल्यास त्यांनी त्वरित जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा. त्यांना मोफत विधी सेवा पुरविली जाईल असे सांगितले. सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सरंक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी केले.आभार माधव डोंगरदिवे यांनी मानले.कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.