आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश:प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्या

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वृद्धी करण्यासाठी सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे आवश्यक आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार संच योजनेचा लाभ मिळवुन द्या असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कृषी यांत्रिकीकरण इत्यादी योजनांचा समावेश होता. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन संचासाठी अनुदान दिले जाते. अल्पभूधारक शेतकरी आणि बहुधारक शेतकऱ्यांसाठी योजनेचे अनुदान वेगवेगळे आहे. जिल्हयात सिंचनाचे प्रमाण बघता सिंचन वाढीसाठी प्रयत्न करावेत आणि शेती समृद्ध करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. डेहणी उपसा सिंचन योजनेत १०० टक्के सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी तातडीने कामे मार्गी लावावित. पाणी वापर संस्थांची स्थापन करण्यासोबतच पाण्याचा जपून वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात शासनाकडून अनुदान दिले जाते. याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी सहायकांमार्फत या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात याव्या. शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

ड्रोन द्वारे फवारणी करण्याची राज्यस्तरीय योजना लागू करण्यात आली आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. यासाठी शेतकरी, शेत्करी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. या योजनेची अंमलबजावणी आणि उपयोग तपासून पुढील वर्षी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याची योजना तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिल्यात.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक ठाकरे, कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. यु. नेमाडे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी डॉ. जया राऊत, हॅप्पी गावंडे, सहाय्यक वैज्ञानिक एस. एस. मोटघरे, घ. दि. तोटे, डॉ. ए. एस. लाटकर, रेशिम विकास अधिकारी व्हि. एस. शिन्दे, प. रा. बरडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...