आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नवरात्रीच्या आनंद पर्वावर पर्यावरणाचे रक्षण करूया‎; ​​​​​​​नवरात्र उत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात संगीता सव्वालाखे यांचे प्रतिपादन‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक बांधिलकी जोपासत ‎पर्यावरणपूरक उपक्रम इको ब्रिकस,‎ ई वेस्ट संकलन मोहीम राबवून ‎पर्यावरणाचे रक्षण करावे. तसेच‎ घरगुती कचरा व त्यापासून होणारी ‎ ‎खतनिर्मिती व सेंद्रिय भाजीपाला‎ निर्मिती घरी करण्याबाबत जिजाऊ ‎फाउंडेशनतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमातून सकारात्मक ऊर्जा‎ मिळते, असे प्रतिपादन संगीता‎ सव्वालाखे यांनी केले.‎ या वेळी सावित्रीबाई व जिजाऊ‎ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात‎ आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ विदर्भ बायोटेकच्या संचालिका‎ संगीता सव्वालाखे, प्रमुख अतिथी‎ स्वाती पवार, इनरव्हील अध्यक्ष‎ प्रतिभा पवार, जिजाऊ‎ फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्या खडसे,‎ प्रकल्प अधिकारी अर्चना डहाके,‎ रुपाली देशमुख, छाया सवाई, चंदा भाले, कल्पना डहाके उपस्थित‎ होत्या. प्रास्ताविक भाषणात संयोजक‎ विद्या खडसे म्हणाल्या नवरात्रीच्या‎ पर्वावर आनंदासोबतच वैचारिक‎ क्रांती करू या व नवविचारांची कास‎ धरण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम‎ उपस्थित महिलांनी दांडिया नृत्य,‎ गरबा, एकल नृत्याचे सादरीकरण‎ करण्यात आले. यासाठी २० दिवसीय‎ दांडिया व गरबा प्रशिक्षण दीपा‎ गेडाम, प्रेरणा भाजीपाले, शीतल‎ लुनावत, जिजाऊ संदीप मंगलम व‎ आदर्श नगर येथे दिले.

विविध‎ क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला संगीता,‎ स्वाती, प्रतिभा यांचा सत्कार‎ करण्यात आला. अंकुर साहित्य‎ संघाच्या जिल्हाध्यक्षपदी तिसऱ्यांदा‎ निवड झाल्याबद्दल सर्व महिलांनी‎ विद्या खडसे यांचा शाल व श्रीफळ‎ देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन स्वाती दरणे यांनी केले,‎ तर आभार विणा दरणे यांनी मानले.‎

इकोब्रिक्स व इ वेस्ट संकलन‎ मोहिमेत व घेण्यात आलेल्या विविध‎ स्पर्धेत प्रांजली गेडाम, उज्वला‎ खडेकर, नलिनी वासेकर, लता‎ ठाकरे, वसुंधरा सूर्यवंशी, उज्वला‎ पाचपुते, सुचिता दरने, अर्चना‎ गावंडे, वनिता गावंडे, सुनंदा‎ डेहणकर, देवका बुरडे, राणी‎ सातुरवार, अबोली डिक्कर यांनी‎ बक्षीस प्राप्त केले. कार्यक्रमासाठी‎ अलका राऊत, माणिक भोयर,‎ वैशाली गुघाने, अनिता खडसे,‎ वैशाली सवई, नेत्रा डुबे, मालती‎ खोडे, कविता काळे, शुभांगी‎ सोनटक्के, सुलभेवार, सुषमा‎ पकाले, वंदना चौधरी, वर्षा लोखंडे,‎ नंदा राऊत, वैशाली भानदवलकर,‎ नीता डगवार यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...