आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयचे आदेश:बाबाजी दाते महिला बँकेचा परवाना रद्द; अवसायक नेमणार

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्यामुळे डबघाईस आलेल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केल्याबाबतचे रिझर्व बँकेचे आदेश धडकले आहे. दरम्यान, शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर रोजीपासून बँकेचा परवाना रद्द झाला. अचानक आलेल्या आदेशाने विद्यमान संचालक मंडळासह सभासदांमध्ये एकच खळबळ माजली आहे. आता बँकेवर अवसायक नेमण्यात येणार असून, वसूलीतून मिळालेल्या रकमेनंतर सभासदांची देणी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सन १९९५ मध्ये शिक्षण व सहकार महर्षी बाबाजी दाते यांनी बाबाजी दाते महिला सहकारी बँक सुरू केली होती.

दाते यांच्या सामाजिक कार्यामुळे जनमानसात बँकेने प्रतिष्ठा प्राप्त केली. महिला बँकेच्या सध्या मुख्य कार्यालयासह एकूण २० शाखा कार्यरत आहेत. बँकेजवळ सध्या ४८६ कोटी रूपयांच्या ठेवी असून, कर्जवाटप ३३० कोटीचे आहे. सध्याची सभासद संख्या सात हजार ९९१ आहे. मध्यंतरी बाबाजी दाते यांचे निधन झाल्यानंतर सीओंसह संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने कर्जवाटप केले. बाबाजी दाते महिला सहकारी बँकेने कर्ज वाटपात मोठ्या अफरातफरी केल्या. बहुतांश प्रकरणात कर्जदारांनी गहाण ठेवलेले संपत्ती, मालमत्ता लाखांच्या घरात आहे. मात्र, त्यावर कोट्यवधींचे कर्ज देण्यात आले आहे.

अशा कर्जदार सभासदांनी परतफेड केलीच नाही. यामुळे बँकेचा एनपीए कमालीचा वाढला होता. वसुलीसाठी बँक प्रशासनाला प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. तरीसुद्धा कर्जाच्या तुलनेत वसूली अत्यल्प होती. बँकेतील शंभरावर कर्जदार सभासदांकडे तब्बल १९७ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ही रक्कम बँकेने दिलेल्या एकुण कर्जाच्या निम्म्याहून अधीक आहे. त्याशिवाय इतर कर्जदारांना दिलेले एकुण कर्ज ३५० कोटींपेक्षा जास्त आहे.

ह्यातील बहुतांश सभासद संचालकांच्या निकटवर्तीय होते. परिणामी, वसूली करताना बँक प्रशासनाला अडचणींना तोंड द्यावे लागले. बँकेचे वाटोळे निघाल्यानंतर आरबीआयने विड्रॉल वर निर्बंध लादले. दरम्यान, बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांना ३० मे २०२२ रोजी नोटीस पाठवली होती. यात बँकेचा परवाना का रद्द करण्यात येवू नये, असे नमूद होते. तद्नंतर मुख्याधिकाऱ्यांनी ह्याचा खुलासा केला, परंतू हा खुलासा असमाधानकारक असल्याची माहिती आता समोर आली आहे. अशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी बाबाजी दाते महिला सहकारी बँक

आरबीआयने बजावली होती नोटीस
बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या संचालकांसह बँकेच्या पदाधिकाऱ्यांचा कार नामा बाहेर आल्यानंतर भारती रिजर्व बँकेने कार्यवाही केली. तर सभासदांना ५ हजार रूपये विड्रॉल करण्याचे निर्बंध सहा महिन्यासाठी लादण्यात आले होते. दरम्यान, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना ३० मे २०२२ रोजी नोटीस पाठवून बँकेचा परवाना रद्द का करण्यात येवू नये, असा समज दिला होता.

त्या भागीदारांकडून वसूलीची शक्यता
बँकेतील रकमेच्या अफरातफरी प्रकरणात माँ भवना जिनिंग प्रसेंगी, सचिन मॅडमवार आणि मंगेश मॅडमवार यांच्याकडून ३० लाख रूपये जप्त करावे, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली. त्या दृष्टीने अवधूत वाडी पोलिसांना कार्यवाही करावयाची आहे. आता पोलिस या प्रकरणात काय पावले उचलणार ह्याकडे तक्रारकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

अवसायक नेमण्याची कार्यवाही करू
बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना रद्दचे आदेश आरबीआयने काढले आहे. त्याचप्रमाणे अवसायक नेमण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच कार्यवाही करू. अवसायक नेमल्यानंतर कर्जाची वसूली करणे आणि सभासदांच्या देणी देण्याबाबत निर्णय घेतल्या जाईल.नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.

बनावट स्वाक्षरीसह खोट्या चेकचा वापर
बँकेतील कर्जाची अफरातफर करताना तत्कालीन संचालकांनी चक्क बनावट स्वाक्षऱ्यांचे चेक दिले. आरटीजीएस फॉर्मवरसुद्धा बनावट स्वाक्षरी करून खोटी कागदपत्रे दाखल केली. ही बाब चौकशीत उघडकीस आली आहे.

बातम्या आणखी आहेत...