आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधिश. पी.बी. नाईकवाड यांनी आरोपी प्रफुल्ल धुळे वय ३१ वर्ष आणि संदिप कुरेकार वय ३५ वर्ष रा. मुरधोनी ता वणी या दोघांना बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे प्रकरण २०१४ पासून विशेष सत्र न्यायालय पाढरकवडा येथे न्यायप्रविष्ट होते. या प्रकरणामध्ये जागतिक महिला दिनी आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात आला. घटनेच्या वेळी पीडिता ही वणी येथे ११ व्या वर्गात शिक्षण घेत होती. त्यामूळे ती गावातून वणीकडे येण्यासाठी ऑटो रिक्षाने प्रवास करीत होती. पीडिता व आरोपी प्रफुल्ल धुळे यांची एकमेकाची ओळख झाली व दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले.
त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत वारंवार जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दि. २७ मार्च २०१४ रोजी प्रफुल्ल पीडितेला वणी येथून त्याचा मोटर सायकलने मारेगाव रोडवरील टेकडीवरील मंदिराचे मागील जंगल भागात घेवुन गेला व तिकडे तो पिडीत सोबत शरिर संबंध करत असताना संदीप कुरेकार व वणी येथील त्याचे दोन मित्र घटनास्थळी आले. त्यांनी पिडीतला शरि र संबंध करू देण्याची मागणी केली व तू कोणाला सांगशील तर तुझी गावभर बदनामी करिल. आणि तुझे अश्लील फोटो फेसबुकवर टाकतो म्हणून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दि. १५ एप्रिल २०१४ राजीवणी ठाण्यात आरोपीविरुध्द तकार नोंदवली होती. तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक प्रज्ञा वाडेकर यांनी प्राथमीक तपास केला व दोषारोप पत्र दाखल केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.