आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यातही काही भागात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पांढरकवडा शहरात व परिसरातही १ जुन रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
मे महीन्यात उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या केळापूर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पांढरकवडा शहरासह ग्रामीण भागातही १ जुन रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असुन तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.