आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याभरापूर्वी तीन ट्रान्सफॉर्मर जळाले:गणेशोत्सवात विजेचा लपंडाव; ब्राम्हणगाववासी झाले त्रस्त

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राम्हणगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या सात ते आठ गावांमध्ये दर अर्ध्या तासाच्या अंतराने विजेचा लपंडाव सुरू असल्याने वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील एक महिन्यापासून सुमारे १५ हजार लोकवस्ती असलेल्या ब्राम्हणगाव येथील तीन ट्रान्सफॉर्मर जळाल्याने सणासुदीच्या काळात विजेचा लपंडाव सुरू असताना वीज कंपनीचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याने गावकरी संताप व्यक्त करताहेत.

उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील ३३ केव्ही सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्राम्हणगावसह परजना, चातारी, बोरी, कोपरा, माणकेश्वर, शिंदगी या गावांमध्ये दर अर्ध्या तासाला विद्युत खंडित करून वीज कंपनीने एकसारखा लपंडाव सुरु केला आहे. त्यातच ब्राम्हणगाव येथील तीन ट्रान्सफॉर्मर एक महिन्यापासून जळाले असतांना विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना या ज्वलंत समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने गावकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे सध्या सणासुदीच्या काळात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराला लोक जाम वैतागले आहेत.

अशातच सध्या सुरु असलेला गणेशोत्सव ज्येष्ठा गौरी उत्सवाची लगबग सुरु असतांना वारंवार बत्ती गुल होत असतांना येथे वीज कंपनीचे कार्यरत अधिकारी हजर राहात नसल्याने कर्मचारीही वेळेवर दांडी मारत असल्यामुळे मोठी डोकेदुखी होत असल्याने वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरीत दखल घेऊन जळालेले ट्रान्सफॉर्मर त्वरीत बसवून वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आहे. विजेच्या लपंडावामुळे गावकरी हैराण झाले असून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समस्या लवकरात लवकर सोडवावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य नयन पुदलवाड यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...