आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:सुमधूर गितांनी झाली लिंगायत पाडवा पहाट; बसव क्लब, हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठानचा उपक्रम

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसव क्लब वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान, लिंगायत महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लिंगायत पाडवा पहाट या भक्तिमय संगीतमय कार्यक्रमाला मराठी नववर्षाच्या रम्य पहाटे महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन येथे प्रतिसाद लाभला.

हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक मेनकुदळे, अमरावतीचे माजी अधीक्षक राजेश कावळे, डॉ. जयेश हातगांवकर, बसव क्लबचे कार्याध्यक्ष विनोद नारिंगे, चंद्रशेखर उमरे, कल्पना देशमुख, आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. तु बुध्दी दे विश्वास दे हे सारिका उमरे ह्यांनी सादर केलेल्या ह्या प्रार्थनेने लिंगायत पाडवा पहाट या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात झाली. एकापेक्षा एक सरस गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत चढत गेली. वंदना बोनकीले हिने बोलावा विठ्ठल, पाहवा विठ्ठल हे गाण आऊन वातावरण विठुमय करून टाकले, तसेच आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, सक्षम अंदुरकर, श्रीराम जयराम, मधुरा मेनकुदळे, कानडा राजा पंढरीचा वीर केळकर, चिमुकल्यांच्या गाण्याने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. संगीता शेटे, चिरायु हातगांवकर, उज्वला नारिंगे, स्नेहल महाजन, उषा कोचे, शिल्पा बेगडे, अमर केळकर, स्मिता गाढवे, नरेंद्र मेनकुदळे, गायकांनी गाणी गायले.

तेजश्री मानेकर ह्यांनी गायलेल्या भैरवीने पाडवा पहाट कार्यक्रमाची सांगता झाली. यादरम्यान या बहारदार कार्यक्रमाचे संचालन शिल्पा बेगडे तर आभार नीलेश शेटे यांनी केले. वाद्यवृंदावर साथ सतीश वाढई आणि त्यांच्या चमूने दिली़, या कार्यक्रमाकरिता विनोद नारिंगे, अनिल बेगडे संजय कोचे, चिरायु हातंगावकर, गिरीष गाढवे, डॉ. किशोर मांडगांवकर, मंगेश शेटे, बाळासाहेब दिवे सुरेश शेटे, निर्मल ठोबंरे, नागेश कुल्ली, अमर केळकर, नागेश कुल्ली, प्रदीप उमरे, डॉ. मंगेश हातगांवकर, डॉ. राजेश उमरे, संजय तोडकरी प्रा.राजेश मानेकर, सारंग गाढवे, रमेश केळकर, राजु मेनकुदळे, आशिष रेवडी, उमरे, अशोक तेले, अशोक जिवरकर, आदींचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...