आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय येथे शुक्रवार, दि. २५ मार्च रोजी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अर्थ सहाय्याने अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत संगीत थेरपी विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता, डॉ. एन. डी. पार्लावार, प्रमुख अतिथी डॉ. विजय माने, संगीत थेरपी प्रशिक्षक डॉ. चंद्रशेखर कुळमेथे, सुनिता कुळमेथे, व्याख्याते रूपेश हिरूरकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. अंजली गहरवार, मंगेष शेटे प्रा, धिरज वसुले, डॉ. रविंद्र सातभाई, डॉ. संदेश बांगर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. पार्लावार म्हणाले की, संगीत मनावरील ताण कमी करते. नकारात्मक विचार जावून सकारात्मक विचार संगीतामुळे येवून मन प्रसन्न व आनंददायी राहते. संगीताने मनाची एकाग्रता राखून प्रसन्न जीवन जगता येते. संगीतामुळे जागरूकता येऊन वर्तमान काळात मन स्थिर होऊन मानसिक व शारिरीक स्वास्थ्य चांगले ठेवता येते. दिवसभरातील विविध घटना, प्रसंगाने वाढणारी अस्वस्थता मनाच्या जागरूकतेने कमी करता येते असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. संगीताच्या माध्यमातुन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आनंदी व प्रसन्न मन ठेवून आपले व्य्क्तीमत्वाचा विकास करावा व जीवनाचा सुखद आनंद सतत घ्यावा असे मत डॉ. पार्लावार यांनी व्यक्त केले. डॉ. विजय माने यांनी आरोग्य ही मुलभूत गरज असून त्यांची काळजी संगीताने घेतली जाते. कामाचा व्याप, ताण घालवण्यासाठी शास्त्रीय संगीताने चांगले आरोग्य व आनंददायी वातावरण निर्माण होते असे मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन व आभार प्रा. अंजली गहरवार यांनी केले. कार्यक्रमाला रूपेश राऊत, प्रा. हेमंत वाघ, डॉ. रोशन शिंदे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. प्रतिक पुसदकर, डॉ. प्रधान, एकनाथ भंकाळे, अस्मिता पाटील, दिपाली शिंदे, मंगला पिंगळे, बंडू भालेकर, शुभम धार्मिक, अधिकारी, कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.