आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठे:साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा

उमरखेड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहिलेले दोनपानी पत्र पाठवले आहे.

अण्णाभाऊ यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले.

साहित्य रचनेच्या माध्यमातून जगभर प्रसार आणि प्रचार करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाची शासनाकडून आजवर उपेक्षा झालेली आहे. फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांचा पगडा असलेल्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे देशाची सर्वोच्च नागरी पुररकारासाठी भारतरत्नसाठी शिफारस करावी, अशा आशयाचे स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.

बातम्या आणखी आहेत...