आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्रस तालुक्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण करत दिग्रस येथील आंबेडकर चौक बौद्धपुरा येथे राहणाऱ्या गरीब रोज मजुरी करणाऱ्या बबन अंबादास बनसोड यांचे घर जमीनदोस्त झाले. पावसाच्या आगमनाने क्षणात या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला. त्याच्या घराचा पंचनामा करून शासकीय मदत मिळावी अशी परिवाराने रास्त मागणी केली आहे. तसेच दिग्रस तालुक्यातील महागाव येथील गणेश शंकर गावंडे यांचे सुद्धा घर पावसामुळे पडले त्यांनी सुद्धा शासकीय मदतीची अपेक्षा व्यक्त केली. संततधार पावसाने दिग्रस तालुक्यातील मिरची, तूर ,सोयाबीन, कापूस या विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी वर्गातील होत आहे.
मागील पंधरा दिवसापासून एक-दोन दिवस सोडला असता सतत पडणाऱ्या पावसाने पीके पिवळी पडत आहे. सूर्यप्रकाशा अभावी पिकांची प्रतिकारशक्ती कमी होऊन नुकसानीची पातळी जास्त होण्याची शक्यता आहे. दिग्रस तालुक्यातील तूप टाकळी येथील शेतकरी गोपाळ नानाजी साबळे यांनी दोन एकरात एप्रिल महिन्यात मिरची लागवड केली व लाखो रुपये खर्च करून मिरची मोठी केली व उत्पादनाला सुरुवात होताच पावसाची मागील जवळपास पंधरा दिवसापासून सतत सुरुवात झाली व मिरचीचे पूर्णतः नुकसान झाले. त्यामुळे मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यासमोर उभे ठाकले असे अनेक शेतकरी मिरची, सोयाबीन तूर कपाशी, अति पावसाने खराब होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. रात्रीपासून झालेल्या पावसाने दिग्रस शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये काही घरात पाणी शिरले. त्या ठिकाणी मुख्याधिकारी सुधाकर राठोड यांनी तातडीने भेट देऊन तात्पुरते पाणी काढण्याची व्यवस्था केली. पाऊस असा सुरू राहाला तर मोरणा व धावंडा या दोन नद्या रौद्ररूप धारण करून दिग्रस शहराला याचा फटका बसू शकतो अशी सुद्धा चर्चा नागरिकांमध्ये आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.