आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य जळून खाक‎:सिलिंडरच्या स्फोटाने लाखोंचे नुकसान‎

पुसद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याच्या शेवटच्या टोकाला‎ असलेले शिवणी गावातील एका‎ घरात रविवारी सिलिंडरचा स्फोट‎ झाल्याने संपूर्ण घर व घरात‎ ठेवलेल्या सामानासह जीवनावश्यक‎ साहित्य जळून खाक झाले आहे.‎ शिवणी येथील राहणाऱ्या त्या गरीब‎ कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याने‎ परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात‎ आहे. त्यांना आर्थिक मदत करावी‎ अशी मागणी आता सर्वच स्तरातून‎ होत आहे.‎ या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, पुसद‎ तालुक्यातील शिवणी येथील उत्तम‎ काळे यांच्या घरात ठेवलेल्या‎ सिलिंडरचा अचानक दि. ५ फेब्रुवारी‎ स्फोट झाला.

स्फोट झाल्याने घराला‎ आग लागली. परंतु सुदैवाने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कोणतीही जीवित हानी झाली नाही.‎ आगीत मात्र घरातील सर्व संसार‎ उपयोगी साहित्यासह घरातील‎ अंथरूण पांघरून, कपडे,भांडी,‎ लाकडी अलमारी, तीन कुलर, दोन‎ पंखे जळुन खाक झाले आहेत. तर‎ घर बांधण्यासाठी पाहुण्यांकडून एक‎ लाख रुपये उसनवारीने घेतलेल्या‎ सर्व जळून खाक झाले आहे.‎

घरातील खाण्या पिण्याचे सर्व‎ साहित्य दोन क्विंटल गहू, ५० किलो‎ तांदूळ,३० किलो तुरदाळ, ५ किलो‎ उडीद डाळ यासह सर्व किराणा‎ सुद्धा जळून खाक झाला आहे.‎ काळे यांच्याकडे एक एकर शेती‎ असून शेती शिवाय ते मजुरीचे काम‎ करतात. पत्नी ललिताबाई यांना दोन‎ मुले व एक मुलगी असून, एक‎ मुलगा व एक मुलगी विवाहित‎ आहेत.तर तिसरा मुलगा शिकत‎ आहे. त्यांचा संपूर्ण संसार‎ उघड्यावर आला असून अंगावरील‎ कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही‎ शिल्लक राहिले नाही. त्यामुळे‎ शासनाने तात्काळ दखल घेऊन‎ त्यांना आर्थिक मदत करावी अशी‎ गावकऱ्यांची मागणी आहे.‎

बातम्या आणखी आहेत...