आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच लाखांची खंडणी:लग्नाचे आमिष, 4 लाखांनी फसवणूक; पाच जणांवर गुन्हे

पुसद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मंगलमूर्ती नगरात राहणाऱ्या व्यक्तीला यवतमाळ येथील दर्डा नगर येथे राहणाऱ्या मुलीकडच्या मंडळींनी लग्नाचे आमिष दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केली. मुलीकडची बाजू असल्याचे सांगून खोटा रिपोर्ट देऊ अशी धमकी देत दि. १० जूनपर्यंत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार दि. १ जूनला घडला होता. या प्रकरणी१९ जूनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळ शहरातील दर्डा नगर येथे राहणाऱ्या राजेंद्र हेंडवे व त्यांच्या पाच कुटुंबीयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मंगलमुर्ती नगरातील राजेंद्र नाईक वय ६० वर्ष यांनी दर्डा नगर येथे राहणाऱ्या हेंडवे कुटुंबा विरोधात तक्रार दिली आहे. , राजेंद्र हेंडवे यांच्या मुली सोबत राजेंद्र नाईक यांच्या मुलाचे जबरदस्ती लग्नाचा बनाव केला. लग्नाचा बनाव करीत हेंडगे कुटुंबीयांनी कारस्थान रचून चार लाख रुपये वसूल केले. तुमच्या विरुद्ध रिपोर्ट द्यायचा नसेल तर दि. १० जूनपर्यंत पाच लाख रुपये द्या! अशी मागणी केली.

व्यापाऱ्याला धमकी, दहा लाखांची मागितली खंडणी
पांढरकवडा शहरातील गांधी वार्डातील एका व्यापाऱ्याच्या कुटंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत दहा लाखाची खंडणी मागण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास मेन लाईन परिसरात घडली. सोनु बिलाल बजाज वय ३२ वर्ष असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मपांढरकवडा शहरातील गांधी वार्डातील व्यापारी सोनू बजाज यांना शनिवारी सायंकाळी ८६६९८०३९५५ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. यावेळी व्यापारी सोनू बजाज आणि बजाज कुटंबीयांना जिवाने मारण्याची धमकी देत दहा लाखाची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी व्यापारी सोनू बजाज यांनी थेट पांढरकवडा पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...