आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:उमरी बागापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी मधूर जाचक

यवतमाळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाभूळगाव तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या उमरी बागापूर ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधूर जाचक यांची गुरूवार, दि. ४ ऑगस्ट रोजी एकमताने अविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षपदी नीलेश गागेकर हे सुध्दा या निवडणुकीत एकमताने अविरोध निवडून आले.

सन २०२२-२०२७ या पंचवार्षिकसाठी संचालक मंडळाची निवडणूक १८ जून रोजी पार पडली. या निवडणुकीत सुहास येंडे यांच्या नेतृत्वात पॅनलने प्रचंड बहुमत मिळवत १३ पैकी १३ जागा जिंकल्या. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक उमरी बागापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कुणजेकार व संस्थेचे सचिव प्रशांत येंडे यांनी ही निवडणूक प्रक्रीया राबविली. यात अध्यक्षपदासाठी मधूर जाचक एकमेव व उपाध्यक्ष पदासाठी नीलेश गागेकर यांचे नामांकन अर्ज दाखल झाले.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोघांचीही अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवड सभेला संस्थेचे सर्व १३ ही संचालक उपस्थित होते.उमरी बागापूर सोसायटीच्या संचालक मंडळावर वरील दोन्ही पदाधिकाऱ्यांसह अनिता कापसे, अंकुश वानखेडे, रवींद्र बुकने, सुहास येंडे, योगेंद्र गावंडे, राहुल गारघाटे, चेतन राऊत, कांचन खापरकर, सविता चौधरी, आनंद देवतळे, दिनेश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी निवडीची घोषणा झाल्यानंतर आतिषबाजी करून समर्थकांनी जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...