आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती महागावच्या एसटी बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याचा फटका येथे येणाऱ्या प्रवाशांना बसत असल्याने प्रवाशी खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी प्राधान्य देत असल्याने यात महामंडळास आर्थिक फटका बसत आहे. बसस्थानकामध्ये प्रवेश करतांना प्रवाशांना खडीचा सामना करावा लागतो. रस्त्याची दयनीय अवस्था होऊन खड्डे पडले असून याकडे मात्र एस टी महामंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. महागाव तालुका निर्मिती झाल्यानंतर काही वर्षे लोटताच प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकाची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला समोर जाण्याची वेळ येत आहे. बसण्यासाठी आसन व्यवस्था व पिण्याचे पाणी नसल्याने प्रवाशी कंटाळून खाजगी वाहनाने प्रवास करतांना दिसुन येत आहे.
एसटी बसस्थानकातीलच अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आले नसल्याने खडी उडून प्रवाशी जखमी होण्याच्या घटना ही घडल्या आहे. या बस्थानकातुन नागपूर, यवतमाळ, आदिलाबाद, लातूर, किनवट, वर्धा, माहूर, पुसद, नांदेड, पांढरकवडा, बार्शी, धाराशिव या ठिकाणी प्रवाशी प्रवास करतात. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांची सतत वर्दळ असते. अश्या परिस्थितीत स्वच्छता गृहाची सुविधा मात्र सलाइन वरच आहे. बसस्थानकाच्या दक्षिणेकडे स्वच्छता गृह असून ते अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्याची स्वच्छता वेळेवर होत नसल्याने प्रवाशी जाणे टाळत आहे. अनेकवेळा वाहतूक नियंत्रक बंडू पारवेकर यांनी वरिष्ठांसह लोकप्रतिनिधीकडे बसस्थानकात सुविधा देण्याबाबत अनेक वेळा निवेदने दिली.
पण त्या निवेदनास केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी उघड्यावरच लघुशंका करतांना दिसत आहे. सध्या कडक उन्हाळ्याला सुरवात झाली असून काही महिन्यानंतर पावसाळ्याला सुरवात होणार आहे. बसस्थानक परिसरात साचणाऱ्या डबक्यांतील पाण्याचा बंदोबस्त होणे ही गरजेचे आहे. तर खड्डया मध्ये पावसाळ्यात पाणी साचून तिथून बस गेल्यास प्रवाशांच्या अंगावर शिंतोडे उडाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ येते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ही निर्माण होत आहे. बसस्थानकाची रचना मुळातच चुकीची झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.