आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:महागावला त्वरित कायमस्वरूपी गटविकास अधिकारी देण्यात यावे; जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

महागाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने गावच्या विकासाचा गाडा हाकण्यास मोठी अडचण येत आहे. त्यामुळे गावांचा विकास करण्यासाठी अडचणी दुर करण्यासाठी कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्यावा अशी मागणी सरपंच संघटनेने जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करीत आमरण उपोषणाचा इशारा दिला.

तालुक्यात ७६ ग्रामपंचायत असुन कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्याने प्रशासनाने अनेक इतर ठिकाणच्या बिडीओं किंवा कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे आलटून पालटून बिडीओं चढा प्रभार देत असुन प्रभारी गटविकास अधिकारी याठिकाणी पुर्ण वेळ राहत नसल्याचा फायदा घेत पंचायत समिती अंतर्गत अनेक विभागातील कर्मचारी आपल्या कर्तव्याला दांडी मारत आहेत.

त्यामुळे अनेक विकास कामांचा खोळंबा झाला असुन तालुका मुख्यालयात पासुन ३०-४० किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या नागरिकांना कोणताही अधिकारी, कर्मचारी मिळत नसल्याने काम न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. प्रभारी गटविकास अधिकारी असल्याने सन २०२०-२१ चढा १५ वित्त आयोग निधी ग्राम पंचायतींना अद्याप खर्च करता आला नाही, सोबतच ऑनलाईन पेमेंट वेळेवर होत नसल्याने अनेक पैसे खात्यातच अडकुन आहेत. येत्या सात दिवसात पुर्ण वेळ उपस्थित राहणारे गटविकास अधिकारी नेमण्यात यावे. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल चिकणे, उपाध्यक्ष प्रा. जयश्री राठोड, कोषाध्यक्ष विकास जाधव, काळी (दौ) सरपंच निशा संतोष राठोड, तुळशीनगर सरपंच नंदा पवार, वनोली सरपंच नरेंद्र जाधव, हिवरी सरपंच अविनाश राठोड, पोहंडुळ सरपंच दिनेश रावते, दहिसावळी सरपंच संतोष कोरके, काळी सरपंच दिगंबर राजने, फुलसावंगी सरपंच शितल भिसे, वरोडी सरपंच गायत्री शिंदे, भांब सरपंच आशाताई कांबळे, गुंज सरपंच पंडित कांबळे, मुडाणा सरपंच वैभव बरडे, राजुरा सरपंच गजानन बुढाळ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...