आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसाद‎:श्री चिंतामणी गणेश जन्म उत्सवात‎ गोदावरी अर्बनतर्फे महाप्रसाद‎

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व सामान्य ग्राहकांना समाजात पत‎ निर्माण करुन देत त्यांचा समाजात सन्मान वाढवणारी‎ गोदावरी अर्बन संस्था समाज सेवेत ही नेहमीच अग्रेसर‎ असते. श्री चिंतामणी गणेश जन्म उत्सव दिंडी यात्रेच्या‎ निमित्ताने कळंब येथे आलेल्या भाविकांना गोदावरी‎ अर्बन कळंब शाखेच्या वतीने महाप्रसादाचे वितरण‎ करण्यात आल्याने भाविकांना दिलासा मिळाल्याची‎ भावना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

गोदावरी‎ अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, गोदावरी‎ समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील आणि गोदावरी‎ अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर,‎ विदर्भ विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली श्री चिंतामणी गणेश जन्म उत्सव दिंडी‎ सोहळ्यास सहभागी झालेल्या भाविकांसाठी गोदावरी‎ अर्बन कळंब शाखेच्या वतीने पुरिभाजी आणि शुध्द‎ पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. याप्रसंगी कळंब‎ शाखेचे अधिकारी योगेश्वर वाटगुळे, अधिकारी जय‎ राठोड, अधिकारी मोहिनी काळे, कनिष्ठ अधिकारी‎ गौरव काळे, कनिष्ठ अधिकारी हेमंत उम्रतकर, उप‎ कर्मचारी मंगेश कोटरंगे यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...