आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:‘राजपूत समाज’तर्फे महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजपूत समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुरूवार, दि. २ जून रोजी वीरशिरोमणी हिंदू सुर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

२५ मेपासून ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सौभाग्यवती सौंदर्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा ह्या सगळ्या ऑनलाईन च्या माध्यमातून घेण्यात आल्या. या स्पर्धेत २१० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच राजपूत युवकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पण करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेत युवा चार संघांनी भाग घेतला होता. दि. २ जून रोजी समाज बांधवांची शहरातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील विविध मार्गक्रमण करीत बस स्टँड चौक येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पन करीत वाघापूर येथील विश्वभारती विद्या मंदिर येथील वीरशिरोमणी हिंदू सुर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे पूजन करीत त्या ठिकाणी रॅलीचे समापन करण्यात आले.सायंकाळी उत्सव मंगल कार्यालयात समस्त शहरातील मोठ्या संख्येत समाज बांधव महिला परिवारासह एकत्र येवून जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अ. भा. क्ष. महासभा विदर्भ अध्यक्ष राजेंद्रसिंह गौर, राष्ट्रीय महामंत्री पंकज सिंह बैस, श्यामसिंह गहरवार तसेच ईश्‍वरसिंह सेंगर, संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्रसिंह बैस, राजपूत महिला संघटनेच्या महिला प्रमुख किरण सोमवंशी मंचकावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्याचे भाषणानंतर विविध स्पर्धेतील विजयी झालेल्या स्पर्धकांना, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवून सर्वाना गौरविण्यात आले. तसेच माही भदोरीया यांनी तयार केलेल्या राजपूत समाज या वेबसाइटचे उद्घाटन शैलेंद्रसिंह बैस यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन विनीता गौतम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन मोहन सिंह शेर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...