आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिन विशेष:पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या राज्यात महाराष्ट्र अग्रेसर; शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालयांत ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

यवतमाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात अस्तित्वात असलेल्या सर्व राज्यांपैकी पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या राज्यात महाराष्ट्र अग्रेसर असून या विचारांतून देशाचे नेतृत्व करत आहे. या गौरवशाली वाटचालीचे आपणही पाईक आहोत, याचा सातत्याने अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन गंगाई बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था, वरधचे संस्थापक सचिव सदाशिवराव महाजन यांनी केले. संस्थेद्वारे संचालित महाजन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले.

यावेळी सर्वप्रथम प्रा. निखिल सायरे यांनी महाराष्ट्र दिनाची पार्श्वभूमी विषद केली. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा. सुहास चौधरी यांनी केले. यावेळी महाजन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. अशोक साळवे, प्रा. अजिंदरसिंह चावला, प्रा. नरेंद्र पंडित, प्रा. स्वप्निल रामटेके, प्रा. गजानन खोडवे, प्रा. निखिल तारेकर, प्रा. अमित नाटेकर, प्रा. डॉ. सुचिता ढेरे, प्रा. स्वाती सरकटे, प्रा. सायली भोयर, प्रा. प्रियंका वासाडे, प्रा. मयुरी इंगोले, प्रा. निशा पवार, प्रा. शुभांगी सुर्यवंशी, प्रा. प्रियंका बेंजामिन, प्रा. नेहा तारेकर, ग्रंथपाल रुपाली गुल्हाणे, शिपाई रवि कोहचाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...