आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी मृत्यू:यवतमाळच्या तरुणाने वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी कठोर परिश्रमाने स्वतः बनवले हेलिकॉप्टर, मात्र ट्रायलवेळी पंखा तुटल्याने झाला मृत्यू

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या तरुणाने केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले होते.

कमी वयात गगणाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा यवतमाळमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी इथे ही धक्कादायक घटना घडली. शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम या तरुणाने स्वतःच्या हाताने कठोर परिश्रम करत हेलिकॉप्टर बनवले. या घरीच बनवलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या हेलिकॉप्टरच्या पंख्याने त्याचा घात केला आहे. पंखा तुटल्याने हेलिकॉप्टर कोसळले आणि तो जागीच ठार झाला.

या तरुणाने केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्याने कठोर परिश्रम करत स्वतःच्या मेहनतीने हेलिकॉप्टर तयार केले होते. मात्र सरावादरम्यान पंखा तुटल्याने उड्डाण भरायच्या आधीच जमीनदोस्त झाले. या अपघातात शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिमचा जागीच मृत्यू झाला. तो केवळ 24 वर्षांचा होता. या अपघाताची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या कर्तबगार तरुणाचा मृत्यू झाल्याने स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेख इस्माईल पत्राकारागीर असल्याने तो लहान आकाराची कपाट, कुलर अशा वस्तू बनवायचा. एक दिवस त्याला हेलिकॉप्टर बनवण्याची कल्पना सुचली. त्याने कठोर परिश्रम करत हेलिकॉप्टर बनवले देखील. या हेलिकॉप्टरची ट्रायल तो घेत होता. यावेळी आजूबाजूला इब्राहिमचे मित्र देखील उपस्थित होते. इब्राहिमने हेलिकॉप्टर सुरू केले, हेलिकॉप्टर आकाशात झेपावू लागले मात्र असे होत असतानाच पंखे तुटले आणि काही कळण्याच्या आत होत्याचे नव्हते झाले. फॅन तुटून इब्राहिमच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...